• Kishan Brigade, Maharashtra
  • Presented By: Mr. Prakash Pohare

About Us

ही संस्था शेतकरी नेते श्री प्रकाश पोहरे यांनी शेतकऱ्यांकरिता 2019 वर्षी सुरू केली.

संस्थेचे उद्देश

  • १). शेतकर्‍यांना संघटीत करणे व त्यांचे कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकरी गट संस्थेमार्फत तयार करणे व शेतीविषयक कार्यशाळांचे आयोजन करणे व शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणे. शेतकर्‍यांचा सर्वागिण विकास करणे.
  • २). कृषी पूरक उत्पादने तयार करण्यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणे, सेंद्रीय शेतीचा प्रसार व प्रचार करणे व जैविक किटक नियंत्रणासंबंधी शेतकर्‍यांमध्ये जागरूकता निर्माण करणे व त्यासंबधी कार्य करणे, शेतकर्‍यांसाठी ग्रामिण आरोग्याची योजना राबविणे करिता निसर्गोपचार केंद्र उघडून त्या संदर्भात प्रचार व प्रसार करत आहेत. ग्रामिण व शहरी स्वच्छतेच्या विविध योजना राबविणे व लोकामध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे.
  • ३). जैवीक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करणे, जैवीक कृषी संशोधन व विस्तार करणे, कृषी संबंधीत परिचर्चा संवाद, कृषि मेळावे, कृषि व्यवसाय प्रशिक्षणे, तसेच कृषि प्रदर्शने आयोजित करणे, कृषि तंज्ञाचे मार्गदर्शन शेतकर्‍यांपर्यंत पोहचविणे.
  • ४). पाणलोट क्षेत्राचा विकास कार्यक्रम संस्थेमार्फत राबविणे. मृदजलसंधारण, शेततळी तसेच कृषि विषयी असलेल्या योजना राबविणे व त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत, संस्थेमार्फत पोहचविण्याचे कार्य करणे.
  • ५). जैविक शेती, गांडुळ खते तथा सैन्द्रीय शेती करण्याबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणे. कृषी क्षेत्रात येणार्‍या नविन संशोधनाचा लाभ शेतकर्‍यापर्यंत पोहचविण्याचे कार्य करणे.
  • ६). शिवार फेरीचे आयोजन करणे तसेच जैवीक पध्दतीने शेती करण्याकरीता शेतकर्‍यांना प्रोत्साहीत करणे.
  • ७). संस्थेमार्फत स्वंय रोजगार सुरू करण्यास प्रोत्साहन देणे व मार्गदर्शक शिबीरांचे आयोजन करणे. कृषी प्रदर्शने तथा कृषी मेळाव्यांचे आयोजन संस्थेमार्फत करणे तथा शेतकर्‍यांचे विविध प्रश्न व समस्या शासन दरबारी मांडणे व त्या सोडविण्याचा प्रयत्न करणे.
  • ८). शेतकरी वर्गातील आत्महत्या थांबविण्या करिता प्रयत्न करणे तसेच त्याकरीता त्यांचे मनोबल वाढविणे.
  • ९). कृषी माला करिता बाजारपेठ उपलब्ध करून देणे व त्याबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणे.
  • १०). शेतकरी व शेतकरी कुटुंबाच्या आरोग्य विषयक योजना राबवुन शेतकर्‍यांमध्ये आरोग्याबाबत जागृती करणे.
  • ११). शेतकर्‍याच्या आर्थिक उन्नतीकरीता शेतकर्‍यांना व्यवसाईक शिक्षण देण्याकरीता प्रशिक्षण केंद्र कार्यान्वीत करणे. शेतकर्‍यांना शेतीच्या मशागतीबाबत आधुनिक तंत्र व यांत्रिकीकरणाचा वापर करुन उत्पादन वाढीस मदत करणे व शेती बाबातच्या औजाराचे प्रशिक्षण देणे.
  • १२). शेतकरी का कर्जबाजारी झालाय याबाबत प्रबोधनात्मक कार्य करणे. शेतकरी कर्जमुक्ती करिता अभियान चालवणे व शासन दरबारी त्याच्या व्यथा मांडणे.

किसान ब्रिगेड ज्ञापन नोंदणी कार्यालय

कार्यालयाचा पत्ता : ३ रा माळा, निशांत टॉवर, गांधी रोड अकोला